श्रीहरी पवळे यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

नवी मुंबई : सरस्वती पुरुषोत्तम मेमोरियल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने आदर्श कलाशिक्षक पुरस्कार 2018 चा श्रीहरी पवळे यांना देण्यात आला. सदर पुरस्कार नुकताच पु.ल. कलाअकादमी प्रभादेवी मुंबई कलाप्राचार्य अरविंद सावंत आणि प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रदिप म्हापसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  

सदर पुरस्कार मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई जिह्यातून सोळा शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीहरी पवळे यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याने शिक्षक ,विद्यार्थी नाटयस्नेही मित्र परिवारातर्फे पवळे सरांचे कौतुक केले जात आहे.  

दरम्यान, स्वरकूल ट्रस्ट ए टू झेड न्यूज मिडिया दिल्ली या संस्थेच्या वतीनेही राष्ट्रीय पुरस्कारासाठी श्रीहरी पवळे यांची निवड झाली असून 16 डिसंबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे सदर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.