बिगर परवानाधारकांना कचरा उचलण्यास मनाई
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 02, 2023
- 339
मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेस अधिकृत परवानगी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला बाजार आवारात रोज टाकाऊ भाजीपाल्याचा ओला, सुका कचरा व पालापाचोळा निघतो. त्यास आता आवाराबाहेर घेऊन जाण्यास मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था मर्यादित, नवी मुंबई यांना सहकार आणि पणन खात्याने अधिकृत परवानगी दिली आहे. तसेच बिगर परवाना धारक घटकांवर नियंत्रण ठेवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने अनेक बेकायदेशीर घटक कोणताही परवाना, परवानगी नसताना भाजीपाला आवारातील टाकाऊ भाजीपाला घेऊन जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्या अनुषंगाने अनेक तक्रारी एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. याबाबत एकनाथ टोके यांनी पणन खात्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने शासनाकडे वेळोवेळी तक्रार दाखल केली आहे. तर मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था यांना बाजार आवारातील टाकाऊ भाजीपाला जनावरांच्या खाद्याकरिता घेऊन जाण्याची बाजार समितीने हरकत दर्शवली असून सदर संस्थेला परवानगी असल्याचे दिसून येते.
त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपविधी 15 नुसार मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था मर्यादित, यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुल बाजार आवारातील टाकाऊ भाजीपाल्याचा ओला, सुका कचरा व पालापाचोळा आवाराबाहेर घेवून जाण्यास सहकार पणन खात्याने 30 ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई यांनी अन्य सर्व बिगर परवानाधारक संस्थेस, घटकांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर बंदी आणून उचित कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर प्रतिबंधित घटकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याबाबत सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश देखील पणन खात्याने निर्गमित केले आहेत. त्यामुळे भाजीपाला बाजार आवारात बिगर परवाना धारकांना कचरा उचलण्यावर चाप बसणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai