जालनातील घटनेचा नवी मुंबईतही निषेध
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 04, 2023
- 255
नवी मुंबई: जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद नवी मुंबईतही उमटले आहेत. वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
“एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला करण्यात आला. मराठा समाजाचा गळचेपी पणा केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच पोलीस अधिकारी तुषार जोशी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार तसेच विजय वडेट्टीवार अंबादास दानवे यांना मराठा हा शब्द उच्चारण्याचा काहीही अधिकार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले, अशी माहिती स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अंकुश कदम यांनी दिली.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आणि माथाडी कामगारांही आंदोलन केले. या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. याप्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास माथाडी कामगार काम बंद आंदोलन करेल असा इशारा देखील सरकारला देण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai