जीएसटी विभागाची पुनर्रचना करण्यासाठी आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2023
- 421
नवी मुंबई ः केंद्र शासनाने जीएसटी विभागाची पुनर्रचना करुन ही यंत्रणा सक्षम केली आहे. केंद्र प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने जीएसटी विभागाची पुनर्रचना करावी यासाठी कोकण विभागातील जीएसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोकणभवनात मोठया संख्येने आंदोलन केले.
वस्तु व सेवा कर जीएसटी कायद्याची अंमलबजावणी 01 जुलै,2017 पासून देशभरात झाली. राज्य व केंद्र शासनाच्या तब्बल चौदा करांचे विलनीकरण होऊन वस्तू व सेवा कर कायदा अस्तिवात आला आहे. सध्या केंद्र व राज्य कर विभाग समान तत्वावरती या कायद्याची अंमलबजावणी करीत आहेत. केंद्राने 2017 मध्येच विभागाची पुनर्रचना करुन यंत्रणा सक्षम केली आहे. परंतू 6 वर्षाहून अधिक कालावधी होऊन देखील अद्याप महाराष्ट्र राज्य कर विभागाने पुनर्रचना केली नाही. त्यामुळे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रचंड घुसमट होत असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. साठी वेळोवेळी पाठपुरावा आंदोलने करुनही प्रश्नाची शासनदरबारी दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी हे तीव्र आंदोलन सुरु केले आहे.
जुलै 2017 मध्ये वस्तू व सेवा कर करसंरचना अस्तिवात आल्यापासून व्यापाऱ्यांच्या संख्येमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अधिकारी कर्मचारी आणि व्यापारी यांच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणाचा विपरीत परिणाम महसूल वसूलीवर होत आहे. अद्याप समितीच्या अहवालावर शासन प्रशासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. यासाठी सोमवारपासून राज्यभरात ठिय्या आणि दोन तास लेखणीबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. विभागाच्या पुनर्रचनाच्या प्रश्नाची दखल न घेतल्यामुळे मोठयासंख्येने अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात गट अ आणि ब कर्मचारी संघटना गट क कर्मचारी संघटना सहभागी होत्या. 250 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai