उष्णता विकारांपासून बचावाचे, उपचाराचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2024
- 469
नवी मुंबई ः मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागांत तापमान वाढताना दिसत आहे. ही उष्णतेची लाट म्हणजे एक मूक आपत्ती आहे. अति जोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटे संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णता विकारांपासून बचाव करावा व त्वरीत योग्य ते उपचार घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान 37 डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मानवाला त्याचा तितकासा त्रास होत नाही. मात्र त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक जास्त असतो. अति जोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटे संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. यामध्ये-उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द नागरिक आणि लहान मुले, स्थूल नागरिक, अयोग्य कपडे घालेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक, काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक तसेच निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास हा मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हाता-पायाला गोळे येणे, चक्कर येणे तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. साधारणपणे उष्णतेमुळे झाल्यास त्या अनुषंगाने प्रथमोपचार करावेत. नागरिकांना उष्णता विकारांची लक्षणे आढळल्यास किंवा याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- लक्षणे
उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिट एक्झॉस्टेशन) विकारात खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर, उलटी, स्नायूंमध्ये गोळे येणे (हिट क्रॅम्पस) पोटाच्या स्नायूत मुरडा, खूप घाम, कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळतात.
- सनबर्नवर प्रथमोपचार करताना साधा साबण वापरून आंघोळ करावी, घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा, कातडीवर फोड असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. उष्मा विकाराचा त्रास होत असल्यास रूग्णाला थंड जागी शक्यतो एसी मध्ये झोपवावे, अंगावरील कपडे सैल करावेत, ओल्या व थंड फडक्याने अंग पुसून घ्यावे, थोडे थोडे पाणी पाजत रहावे तसेच उलटी होत असेल तर पाणी देऊ नये व दवाखान्यात हलवावे.
- उपाय
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. कष्टाची कामे उन्हात करु नये. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नये. गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नये. उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळावे. स्वयंपाकघर हवेशीर ठेवावे. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे. जास्त प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नये.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai