10 डिसेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 02, 2024
- 316
नवी मुंबई : कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे.
सदर पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शन धारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून पेन्शन विषयी आपले प्रश्न उपस्थित करावे. असे तहसिलदार,(सामान्य प्रशासन) कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
9 डिसेंबरला विभागीय लोकशाही दिन
नवी मुंबई : कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 09 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाही दिनाच्या बैठकीस सर्व विभागीय स्तरावरील प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी विभागीय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे कोंकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विवेक गायकवाड यांनी कळविले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai