नागरी सुविधा कामांच्या निविदांसाठी तांत्रिक समिती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 07, 2024
- 555
कामकाजात येणार सूसुत्रता व गतीमानता
नवी मुंबई ः पालिका क्षेत्रात रस्ते, पदपथ, गटारे, इमारती, नाले तसेच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत अशी विविध प्रकारची नागरी सुविधा कामे करताना अर्थसंकल्पातील संबधित लेखाशिर्षांतर्गत तरतूदी अन्वये तांत्रिक मान्यता व प्रशासकिय मान्यता झाल्यानंतर निविदा काढण्यात येतात. या निविदा प्रक्रियेत सुनियोजितपणा व गतीमानता येण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांची निविदा शत / पूर्व अहर्ताबाबत तांत्रिक समिती स्थापन केली आहे.
प्रस्तावित कामांच्या निविदा काढतांना त्यामध्ये कामाच्या स्वरुपानुसार काही बदल करण्यात येतात. या निविदा सादर करतांना प्रमाण निविदा बनवून निविदेमध्ये सारखेपणा येण्यासाठी प्रत्येक कामाची निविदा अद्ययावत शासन निर्णयाप्रमाणे शहर अभियंता यांच्या मंजूरीनंतर वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दीसाठी पाठविण्यात येतात. निविदेच्या कार्यालयीन प्रक्रियेत अधिक सूसुत्रता व पारदर्शकता येण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवून जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने तसेच अर्थसंकल्पात नमूद कामे त्याच अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार पूर्ण होण्यासाठी कार्यनियोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक व पूर्ण झालेल्या निविदांच्या सर्व नस्ती संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेमार्फत कार्यकारी अभियंता (प्रकल्प नियोजन) यांचे अधिनस्त असलेल्या उपअभियंता यांनी तपासून व छाननी करुन कार्यकारी अभियंता (प्रकल्प नियोजन) यांचेमार्फत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांच्याकडे निविदा मंजूरीसाठी सादर करावयाच्या आहेत. या कामामध्ये सूसुत्रता येण्याकरिता व निविदाविषयक कागदपत्रे अद्ययावत करण्याकरिता निविदा शत / पूर्व अहर्ता बाबतची तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये निवृत्त सचिव अथवा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग वा एम एस आर डी सी आणि समकक्ष मुख्य अभियंता या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचप्रमाणे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता आणि महानगरपालिकेचे निवृत्त शहर अभियंता हे सदस्य असतील. महानगरपालिकेचे प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता हे समितीचे सदस्य सचिव असतील. या निविदाविषयक तांत्रिक समितीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या नागरी सुविधा कामांमध्ये सुनियोजितपणा व पारदर्शकता येणार असून कामकाजाचा वेगही वाढणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai