कोपरखैरणेतील निसर्गोद्यानात बीज संकलन केंद्र आरंभ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2025
- 432
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेवग्याच्या 1 हजार वृक्षरोपांची लागवड
नवी मुंबई ः माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये सर्वोत्तम पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक असून यामध्ये अधिक भर घालण्यासाठी निसर्ग उद्यान, से.14 कोपरखैरणे येथे ‘बीज संकलन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. त्याचा आरंभ उद्यान विभागाच्या परिमंडळ 2 उपआयुक्त नयना ससाणे यांच्या हस्ते, उदयान विभाग परिमंडळ 1 चे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बोलतांना उद्यान विभागाच्या परिमंडळ 2 उपआयुक्त नयना ससाणे यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत आपण घरी वेगवेगळी फळे आणतो, ती खाऊन झाल्यानंतर त्याच्या बिया संकलीत करुन ठेवल्यास व त्या मोकळया जागांवर मातीत पेरल्यास वा टाकल्यास त्यातून वृक्षसंपदा वाढीस लागू शकते असे सांगितले. ही भूमिका नजरेसमोर ठेवून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘बीज संकलन केंद्र अर्थात सीड बँक’ सुरु करण्यात आली असून नागरिक आपल्याकडे जमलेल्या बिया याठिकाणी आणून देऊ शकतात. याचा उपयोग उद्यान विभागामार्फत बिजांपासून रोपे तयार करण्यासाठी करेल अशी माहिती त्यांनी दिली. अशाच प्रकारची सीड बँक घणसोली येथील सेंट्रल पार्क या ठिकाणी सुरु करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने सर्वच विभागांमध्ये त्या सुरु करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी विविध वृक्षांच्या संकलीत केलेल्या बियांची पाहणी केली. विशेषत्वाने उपस्थित मुले वृक्षांच्या बिया पहिल्यांदाच पाहत असल्याने त्यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता होती. आगामी काळात याठिकाणी ‘बीज गोळा’ तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्रही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त नयना ससाणे यांनी दिली.
यावेळी उद्याच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्यदायी वृक्ष मानल्या जाणाऱ्या शेवग्याच्या 500 वृक्षरोपांचे मान्यवरांच्या तसेच नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र, इच्छापूत संस्था कोपरखैरणे गाव, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, आदिशक्ती संस्था यांच्या पदाधिकारी व सदस्यांनी उत्साही सहभाग घेतला. अशाच प्रकारे शेवग्याच्या 500 वृक्षरोपांची लागवड अडवली भुतावली येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात करण्यात आली. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai