Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित विशेष समारंभ प्रसंगी आयुक्तांनी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकिय कर्मचारी यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व आरोग्य विभागामार्फत चांगले काम सुरु असल्याचे सांगत अधिक उत्तम काम करुन नागरिकांना समाधानकारक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी काम करुया अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी काही डॉक्टर्स व आरोग्यकमना प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक आरोग्य दिनाची या वषची संकल्पना निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य ही असून त्यास अनुसरुन निरोगी सुरुवातीच्या दृष्टीने शून्य ते चार वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बालमृत्यू व गरोदर माता मृत्यू यांचे प्रमाण शून्य करण्यासाठी गरोदर मातांचे व त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांचे प्रबोधन करावे असे सांगितले. याप्रसंगी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे तसेच पालिकेच्या तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकिय अधिक्षक व पदव्युत्तर पदवी वैद्यकिय शिक्षण संस्थेचे प्रमुख व्यासपिठावर उपस्थित होते. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ऐरोली रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे व वाशी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक राजेश म्हात्रे यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्वोत्तम रुग्णालय म्हणून प्रशस्तिपत्र देउुन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्तम प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचा सन्मान अनुक्रमे नेरुळ फेज 1, सिबीडी बेलापूर व नोसील नाका या केंद्रांना प्रदान करण्यात आला. 477 आशा सेविकांमधून प्रतिक्षा पांचाळ, सुशिला कोकणे, अनिशा शेख यांना सर्वोत्तम आशा सेविका म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
आयुक्तांनी भारतातील बालके व गरोदर माता मृत्यू प्रमाण आणि लसीकरण याची आकडेवारी सांगत नवी मुंबईमधील स्थिती या बाबत सर्वोत्तम राहिल हे लक्ष्य ठेवून काम करण्यास सांगितले. या दृष्टीने नागरिकांशी दैनंदिन थेट संबध येणाऱ्या आशा सेविका तसेच एएनएम यांची जबाबदारी मोठी असल्याचे सांगत यांचेमार्फत प्रबोधन व्हावे व निरीक्षण ठेवण्यात यावे अशा सुचना आयुक्तांनी केल्या. पालिकेच्या बालवाडी, अंगणवाडीतील शुन्य ते तीन वर्षाच्या बालकांची तपासणी होत असते. या व्यतिरिक्त खाजगी अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांचीही आरोग्य तपासणी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरातील बालके कुपोषित राहू नयेत यादृष्टीने महापालिका रुग्णालयात न्यूट्रिशन रिहॅबिलेटेशन सेंटर सुरु करावे तसेच एनआरसी युनिट तातडीने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी असे आयुक्तांनी निर्देश दिले. नवी मुंबई पालिकेच्या वतीने अनेक उल्लेखनीय कामे करण्यात येतात. त्या कामांची व्यवस्थित नोंद करुन डॉक्युमेंटेशन करावे, जेणेकरुन इतरांना ते मार्गदर्शक ठरेल अशाही सुचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. वैद्यकिय अधिकारी प्रशांत जवादे यांनी मागील वर्षाभरात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सेवेत करण्यात आलेल्या विविध सुविधा कामांचा व सुधारणांचा सविस्तर आढावा घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai