दिवाळे जेट्टी स्वच्छता मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2025
- 298
नवी मुंबई ः जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून दिवाळे येथील जेट्टी नजिकच्या खाडी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि नेरुळच्या एसआयईएस महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन खाडी किनारा परिसराची स्वच्छता केली.
शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने 22 एप्रिल रोजीच्या जागतिक वसुंधरा दिनापासून दि. 1 मे रोजीच्या प्रदूषणमुक्त महाराष्ट्र दिनापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या विशेष उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सध्या वातावरणात होणाऱ्या बदलामुळे प्राणी जीवनाला व निसर्गाला मोठया प्रमाणावर धोका निर्माण झाला असून ते रोखण्यासाठी निसर्गातील पृथ्वी, वायू, अग्नी, जल व आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. हीच भूमिका नजरेसमोर ठेवून जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण प्रत्येकाने वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन हे आपले कर्तव्य असल्याचे लक्षात घेत आपल्या परीने निसर्ग संवर्धन कार्यात योगदान द्यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केले. दिवाळे येथील जेट्टी नजिकच्या खाडी परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेप्रसंगी ते बोलत होते. त्यामधील स्वच्छता मोहीमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि नेरुळच्या एसआयईएस महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन खाडी किनारा परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी सर्वांनी जेट्टी जवळील पाणथळ भाग तसेच खारफुटी नजीकचा भाग याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविली. विशेषत्वाने प्लास्टिकचे तुकडे, मासे पकडण्याच्या जाळीचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या व काचेच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. तसेच कचराही संकलीत करण्यात आला. हा मोठया प्रमाणात जमा झालेला कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे वाहून नेण्यात आला.
खाडीच्या भरतीसोबत पाण्यातून मोठया प्रमाणावर कचरा किना-यालगत येत असतो. अशा कच-याचे संकलन करण्यात आले. या दृष्टीने समुद्र, खाडी, तलाव अशा जलस्त्रोतांमध्ये कचरा टाकून जलाशयातील जैव सृष्टीला धोका पोहचतो हे लक्षात घेऊन नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा जलस्त्रोतांमध्ये टाकू नये असे आवाहन खाडी किनारा सफाई केल्यानंतर उपस्थितांना व नागरिकांना करण्यात आले.
- शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी
22 एप्रिल ते 1 मे या शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या ब्रीदवाक्यानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केलेली आहे. 22 एप्रिल रोजी महापालिका क्षेत्रातील 434 प्राथमिक शाळांमध्ये प्रभात फेरीच्या स्वरूपात राबविण्यात आला. ज्यामध्ये दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपापल्या शाळा परिसरात वसुंधरा संरक्षण संवर्धनाविषयी व्यापक जनजागृती केली. सकाळच्या सत्रात काढण्यात आलेल्या या प्रभात फेऱ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृतीपर फलक उंचावत, घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय परिसरातील नागरिकांपर्यंत वसुंधरा रक्षणाचा व संवर्धनाचा संदेश पोहचविला. या प्रभात फेऱ्यांमध्ये प्राथमिक माध्यमिक दोन्ही विभागाचे सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमातील शाळांचे एकूण 1 लाख 77 हजाराहून अधिक विद्याथ सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai