वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 16, 2025
- 230
एप्रिल ते जुलै पर्यंत 5 कोटी 94 लाखाची वीज चोरीची 889 प्रकरणे उघडकीस
मुंबई : महावितरणची वीज वितरण हानी कमी करण्यासाठी विशेष मोहीम भांडूप परिमंडलात राबविण्यात येत आहे. याकरिता, वीज जोडणी तपासणी, वीज मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरू असतात. या तपासणी मध्ये भांडुप परिमंडलात माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 या तीन महिन्यात विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 व कलम 135 अंतर्गत एकूण 889 प्रकरणे उघडकीस आली आहेत व 5 कोटी 94 लाखाच्या दंड आकारण्यात आला आहे.
ग्राहकांना किफायतशीर दराने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ऊन,पाऊस, वाऱ्यात काम करत असतात तसेच ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी झटत असतात. परंतु अशा बेकायदेशीर रित्या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमुळे अधिकारी कर्मचारी तसेच प्रामाणिक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. मीटर मध्ये फेरफार करणे, रिमोट द्वारे वीजचोरी करणे अथवा वीज तारांवर काटा टाकून वीजचोरी केली जाते. वीज कायदा 2003 नुसार वापरातील अनियमितता विद्युत कायदा कलम 126 व विद्युत कायदा 2003 कलम 135 बाबत माहिती खालील प्रमाणे आहेत:
मंडळ वापरातील अनियमितता (कलम 126) वीजचोरी प्रकरणे (कलम 135)
प्रकरणे दंड राक्कम (लाख) प्रकरणे दंड रक्कम
(लाख)
वाशी 36 13.19 309 243.09
ठाणे 48 36.4 329 211.51
पेण 36 22.39 131 66.73
महावितरण भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी वीजचोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व ग्राहकांना प्रामाणिकपणे वीज जोडणी घेऊन वीज वापर करण्याचे तसेच वीज वापराचे अनियमीतत करणाऱ्या अथवा चोरी करणाऱ्या ग्राहकांची माहिती महावितरणला कळवण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai