कोपरखैरणेतील कनेक्टिंग लिंक ब्रिज सेवेत दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 18
नवी मुंबई ः महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे विभागात उभारण्यात आलेल्या पावणे ब्रिज ते सेक्टर-11 ला जोडणाऱ्या नवीन कनेक्टिंग लिंक ब्रिजचे लोकार्पण राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईकसाहेब यांच्या हस्ते पार पडले. या पुलामुळे कोपरखैरणे, बोनकोडेतून एपीएमसी-तुर्भेकडे जाण्यासाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
कोपरखैरणे येथून एपीएमसी माक कोपरखैरणे विभागातून एपीएमसी मार्केटकडे जायचे असल्यास मोठा वळसा घालून जावे लागते. तथापि पावणेश्वर उड्डाणपुलाखालील रस्ता आणि सेक्टर 11 कोपरखैरणे येथील रस्ता यामधील मोठ्या नाल्यावर 41 मी. लांबीचा आणि 7.50 मी. रूंदीचा हा पूल बनविण्यात आल्याने नागरिकांची इंधन बचत होणार आहे तसेच वेळेचीही बचत होणार आहे. या पूलामुळे प्रामुख्याने कोपरखैरणे सेक्टर 11, खैरणेगाव आणि बोनकोडेगाव येथील नागरिकांना एपीएमसी मार्केटकडे जाण्यासाठी हा सुलभ मार्ग आहे. त्यासोबत तुर्भे एपीएमसी व सानपाडा येथून कोपरखैरणे भागात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी नागरिकांना हा पूलाचा रस्ता सोयीचा असणार आहे. त्यासोबतच तुर्भे एपीएमसी व सानपाडा परिसरातून कोपरखैरणे तसेच ठाणे बेलापूर रोडकडे जाणाऱ्या नागरिकांनाही हा पर्यायी रस्ता उपलब्ध होत आहे. महत्वाचे म्हणजे या पूलावरील रस्त्यामुळे वाशी- कोपरखैरणे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी फायदा होणार आहे. परिणामी, नागरिकांचा रोजचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित व सुरळीत होऊन त्यांच्या दैनंदिन प्रवासाला नवी गती आणि सुलभता प्राप्त होणार आहे. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल, वैष्णवी नाईक, अदिती नाईक, स्विकृत नगरसेवक अमित मेढकर, माजी नगरसेवक लिलाधर नाईक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai