ऐरोलीत 19 अनधिकृत बांधकामांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 18
नवी मुंबई ः महापालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत मंगळवारी 13 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. ॲड. किशोर शेट्टी यांनी कोर्टात दाखल केलेल्या पीआयएल अवमान याचिका सीपी/685/2025 मध्ये अनधिकृत विनापरवानगी इमारतींची छायाचित्रे सादर केलेली आहेत. या छायाचित्रांमध्ये नमूद अनधिकृत इमारतींना जी ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. त्या अनुषंगाने ही तोडक कारवाई करण्यात आली.
ही 13 अनधिकृत बांधकामे येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सुरुवात केली होती. संबंधितांना कलम 54 अन्वये बजाविण्यात आलेल्या नोटिशीस अनुसरून त्यांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे गरजेचे होते मात्र तसे न केल्याने तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकामे अंशतः निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी आठही विभागांचे विभाग अधिकारी तथा आयुक्त उपस्थित होते. बुधवारी पुन्हा 6 अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. अनधिकृत इमारतींना व त्याव्यतिरिक्त इतर अनधिकृत बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना जी ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. त्या अनुषंगाने सदर अनधिकृत बांधकामे अंशतः निष्कासित करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai