कोरोना काळात पालिकेत 175 कोटींचा घोटाळा?
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 36
नवी मुंबई महापालिकेतील खर्चावर भ्रष्टाचाराचे आरोप; आरटीआयच्या माहितीने उपस्थित केले सवाल
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मोठ्या आर्थिक खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या काळात करण्यात आलेल्या 230 कोटीं रुपयांच्या खर्चापैकी सुमारे 175 कोटी रुपयांचा हिशोब महापालिकेकडे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा कोट्यवधींचा हिशोब नेमका कुठे आहे? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते नरेंद्र हडकर यांनी केला आहे.
सन 2020 ते 2022 या कोरोना काळात नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य, शहर अभियंता, घनकचरा, आपत्ती व्यवस्थापन आणि परिवहन विभागामार्फत कोविड सेंटर, रुग्णालयीन सुविधा, औषधे, वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन व्यवस्था, मनुष्यबळ तसेच विविध आपत्कालीन उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. या खर्चाचा तपशील, खरेदी प्रक्रिया आणि निधीचा प्रत्यक्ष वापर याबाबत हडकर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून माहिती मागूनही संबंधित विभागांकडून पूर्ण माहिती देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही विभागांकडून तर संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचे हडकर यांनी नमूद केले.
पूर्ण माहिती मिळत नसल्याने हडकर यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शासनाने प्रकरणाची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत महापालिकेला कळविल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर झालेल्या कार्यवाहीबाबत शासनाला अथवा तक्रारदाराला महापालिकेकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, कोरोना काळातील खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तदर्थ समितीनेही विविध खर्च, खरेदी आणि निधीच्या वापराबाबत माहिती मागवली होती. मात्र समितीलाही अपेक्षित माहिती मिळत नसल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य सुविधांसाठी खर्च झालेला निधी हा सार्वजनिक पैसा असल्याने त्याच्या वापराबाबत पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे 175 कोटींच्या कोरोना खर्चाचा संपूर्ण हिशोब जनतेसम
- 223 कोटींचा खर्च; 55 कोटींचाच तपशील
हडकर यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात महापालिकेच्या विविध विभागांनी सुमारे 223 कोटी रुपयांचा खर्च केला. त्यामध्ये आरोग्य विभागाचा सुमारे 120 कोटी, शहर अभियंता विभागाचा 60 कोटी आणि घनकचरा विभागाचा सुमारे 50 कोटी रुपयांचा खर्च असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आरटीआयच्या उत्तरात केवळ सुमारे 55 कोटी रुपयांच्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित निधीचा वापर कोणत्या कामांसाठी करण्यात आला? कोणत्या वस्तू व सेवा खरेदी करण्यात आल्या? त्यासाठी किती रक्कम अदा करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे हडकर यांनी म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai